श्रीनगर-जम्मू काश्मीरच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रिता जतिंदर यांची टीव्हीवर मुलाखत सुरु असतांनाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रिता जतिंदर या गुड मॉर्निंग जम्मू काश्मीर या लाइव्ह कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांना टीव्ही अँकरने प्रश्न विचारले त्यावर त्या बोलत होत्या. मात्र बोलता बोलता त्या अचानक शांत झाल्या आणि खुर्चीवरून कोसळल्या.
Educationist, Ex Principle & Writer #RitaJatinder tender breath her last in todays Morning #Live Breakfast Show #GoodMorningJK on @DDKashirChannel at 8:30am. She was 82years Old. Before the Programme she has Expressed her wish that she want to Die Well Dressed!#RestInPeace.. pic.twitter.com/UySKptNEOT
— ????अनुपम यादव Anupam Yadav انوپم یادو (@anupamyad) September 10, 2018
टीव्ही शोमध्ये असलेल्या दोन्ही टीव्ही अँकर्सना क्षणभर काय होते आहे ते समजलेच नाही. रिता जतिंदर अशाप्रकारे अचानाक खुर्चीवरून कोसळल्याने लाइव्ह कार्यक्रम बंद करून त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दूरदर्शनवर हा कार्यक्रम सुरू होता. जो बंद करण्यात आला.
रिता जतिंदर यांची मुलाखत सुरु होती. त्या टीव्हीवर आपल्या आयुष्याबाबत एकंदरीत जीवन प्रवासाबाबत बोलत होत्या. बोलता बोलता त्यांचा आवाज अचानक बंद झाला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा आवाजही बंद झाला. ज्यानंतर त्या खुर्चीवरून कोसळल्या. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला