मुंबई :- टीसीआय एक्सप्रेस या निश्चित वेळेत एक्सप्रेस वितरण करणा-या भारतातील आघाडीच्या कंपनीने ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि संपलेल्या वर्षाच्या आर्थिक निकालांची घोषणा केली. कंपनीने चौथ्या तिमाहीच्या निव्वळ महसुलात २३.१८ टक्क्यांची वाढ नोंदवली असून तो २४९.९४ कोटी रुपये आहे, तर ईबीआयटीडीए गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२.४४ टक्यांच्या वाढीसह २९.०१ कोटी रुपये आहे. महसुलामध्ये वाढ झाल्यााने या तिमाहीदरम्यान कंपनीच्या गेल्या २ वर्षांच्या याच कालावधीशी तुलना करता, कंपनीच्या करपश्चात नफ्यात ४९.४२ टक्यांची वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये निव्वळ महसूलात १८.०३ टक्यांची वाढ होऊन तो ८८७.१६ कोटी रुपये राहिला, तर आर्थिक वर्ष २०१७-१८ करिता ईबीआयटीडीए गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६.५६ टक्यांची वाढ दर्शवत ९२.७३ कोटी रुपये राहिला. आर्थिक वर्ष २०१६-१७ पेक्षा २०१७-१८ मध्ये करपश्चात नफ्याने ५८.४० कोटी रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ आर्थिक वर्ष २०१६-१७४ पेक्षा ५५.७६ टक्यांनी अधिक आहे.
टीसीआय एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चंदर अग्रवाल म्हणाले, ”जीएसटीची आता हळूहळू मार्केटला सवय होत आहे. ब-याच प्रबळ क्लायंट्सना आमच्या रुपात अगदी योग्य भागिदार मिळाले, जेणेकरुन त्यांना या परिवर्तनीय नियामक नियमाच्या संभाव्यता खुल्या करण्यास मदत मिळाली. मागील काळात सेक्टरमध्ये उलथापालथ दिसून येत होती, पण आता सर्व निर्देशांक आशावादी आहेत. तसेच आमच्या सर्वोत्तम सेवांनी आम्हाला आमच्या ग्राहकांना अगदी अतुलनीय अशी बाधारहित सेवा देण्याकरिता सक्षम बनवले आहे. निकालाच्या आकड्यांनी आम्ही खूश आहोत आणि आमच्या ग्राहक व भागधारकांकरिता अधिक चांगली मूल्यनिर्मिती करतानाच आम्ही भारताच्याक विकास गाथेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.”