टी.डी.एफ ला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन

0

नंदुरबार । टी.डी.एफ ला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, प्रत्येक जिल्हात शिक्षण भवन उभारून शिक्षकांची आणि त्यांच्या कुटुंबाचा कसा विकास होईल, यासाठी प्रयत्न करेल. जुनी पेन्शन हेच आपले मिशन या विचाराने सर्व स्तरातील कर्मचार्‍यांसाठी माझी आमदारकी पणाला लावेन. असा विश्‍वास व्यक्त करत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे टी.डी.एफ.चे अधिकृत प्रा. संदीप बेडसे यांनी जाहीर प्रचाराचे रणशिंग फुंकले. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जुन 2018 मध्ये होणार आहे. त्यासाठी नंदुरबार येथे नगर , नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्यातून विविध संघटनाच्या कार्यकत्यांचा मेळावा 10 मार्च रोजी निलेश लान्स येथे आयोजित करण्यात आला होता.

सर्वस्तरातून पाठिंबा
प्रा.संदीप बेडसेनी विभागातील विविध संघटनेच्या नेत्याना, राजकीय नेत्यांना संस्था चालकांच्या भेटी गाठी घेतल्या आणि नंदुरबार येथे नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनानी मेळावा आयोजित केला. मेळाव्यास 3000 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी प्रा.संदीप बेडसेना पाठिंबा दिला.

समाजोपयोगी कामे
नशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांनी टी.डी.एफ. आणि टी.डी.एफ.चे गतवैभव याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच प्रा.संदीप बेडसे यांनी उमेदवारीबाबत सविस्तर निवेदन केले. मा.आमदार नानासाहेब जयवंतराव ठाकरे यांनी प्रा.संदीप बेडसे यांचा कौटुंबिक राजकिय व पुरोगामी वारसा असून, समाजोपयोगी कामे केल्याचे सांगितले

विजयासाठी प्रयत्न करा
जेष्ठ नेते वि.मा.भामरे, हनुमंतराव भोसले पुणे, हिरालाल पगडाल संगमनेर, कोकाटे आबा अहमदनगर यांच्यासह सर्वच नेत्यांनी प्रा.संदीप बेडसेच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. टीडीएफचे अधिकृत उमेदवार प्रा.संदीप बेडसेनी यांनी टी.डी.एफला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझे वडील टी.टी.नाना बेडसे यांचे स्वप्न साकार करणे हेच माझ्या जीवनाचे सार्थक असेल असे स्पष्ट केले.