कोलकाता : रोहितला भारत आणि विंडीज यांच्यातील टी-२० मालिकेतही नवा विक्रम करण्याची संधी आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी रोहितला आहे. यामालिकेत विराटच्या अनुपस्थितीत रोहित संघाची धुरा सांभाळत आहे. आजपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे. त्याने २ हजार २७१ धावा काढल्या आहेत. रोहितने ८४ सामन्यांत ३२.५९ सरासरीने २ हजार ०८६ धावा काढत या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. सध्या रोहित भन्नाट फॉर्मात असून त्याला या यादीत पहिल्या स्थानावर येण्यासाठी १८५ धावा काढाव्या लागतील.