नवी दिल्ली । टी20 किक्रेटनंतर यूएईमध्ये टी10 लीगला सुरुवात झाली आहे. या लीगचे वैशिष्ट्य म्हणजे शाहिद आफ्रीदी, वीरेंद्र सहवाग, ऑयन मॉर्गन, एलेक्स हेल्स, मोहम्मद आमिर यांसारखे खेळाडू खेळणार आहेत. या स्पर्धेतील क्रिकेटपटूंसाठी खूशखबर म्हणजे शतक आणि अर्धशतक ठोकणार्या खेळाडूंचेदेखील नशीब चमकणार आहे. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, दुबईत 5 लाख दिर्हॅम म्हणजेच 85 लाखांचे घर मिळेल. तर अर्धशतक लगावणार्या खेळाडूंना ह्यूबलॉटचे घड्याळ मिळेल. याची किंमत 5 लाखांपासून सुरू होते. मराठा अरेबियंस संघाचे मालिक अली तुंबींच्या वतीने खलीज टाइम्सने सांगितले की, जे कोणी फलंदाज शतक ठोकवेल त्याला 5 लाख दिर्हॅमचे घर मिळेल.
बाकी कोणत्या संघाबद्दल मला ठाऊक नाही. पण माझ्या संघातील एलेक्स हेल्स, वीरेंद्र सहवाग आणि कामरान अकमल यांसारखे खेळाडू शतक लावू शकतात. हा टी10 चा नवा फॉर्मेट असून याची पहिली स्पर्धा फक्त चार दिवस रंगणार आहे. 10-10 षटकांच्या या लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी होतील. लीगमधील एक सामना 90 मिनिटांचा असेल.