टॅंकर अपघातात एकाचा मृत्यू – दोन जखमी

0
चाळीसगाव – चाळीसगाव कन्नड रोडवर पेट्रोल पंपासमोर केमीकलच्या टॅंकरने मोटारसायकलला मागावुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाल्याची घटना दिनांक १४ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली असुन कंटेनर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, गुजरात धहेज वरुन केमीकलचा टॅंकर क्रमांक (जीजे ०६, एएक्स ९४२१) हा हैद्राबाद कडे चाळीसगावकडून औरंगाबाद मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना १४ रोजी कन्नड रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास रेलता ता.कन्नड जि. औरंगाबादकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक (एमएच २०, ईएन ६६३०)ला मागावून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलच्या मागे बसलेल्या गणेश परशुराम नागे (वय-३८) रा.रेलता ता.कन्नड यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले नारायण ज्ञानेश्वर जाधव (वय-३५), भरत एकनाथ नागरे (वय-२६) दोघे रा रेलता ता कन्नड हे जखमी झाले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत याप्रकरणी मच्छिंद्र जगनराव धेटे (वय-४२) रा.रेलता ता.कन्नड यांच्या फिर्यादीवरुन कंटेनर चालक खलील नबी रसुल मोरडी (वय-३५) रा.खैराट ता.अक्कलकोट जिल्हा सोलापूर याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि जगदीश मुगलीर करीत आहेत.