अमळनेर । येथील रिक्षा व टॅक्सी युनियनतर्फे केंद्र शासनाने टॅक्सी व रिक्षासाठी वाढीव शुल्क आकारण्यात आल्याने 31 जानेवारी रोजी एकदिवसीय बंद ठेवून निषेध नोंदविला व त्या संदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शहरातील 71 टॅक्सी, 15 टॅक्सी शिरपूर, 25 चोपडा, 10 नरडाना, 90 धुळे , 90 सद्गुरू जिप टॅक्सी, 100 मालवाहतुक, 40 सुभाष चौक रिक्षा स्टॉप, 80 सेंट मेरी प्रायव्हेट व परमिट गाडया व सुभाष चौधरी मालवाहतूक संघटना यांनी सहभाग नोंदवला.
असे आहेत नवीन दर टॅक्सी पासिंग 300 वरून 600 व उशीर झाल्यास 50 रु दंड, लायसन नूतनीकरण फी 350 वरून 465 उशीर झाल्यास 1 दिवस ते 1 वर्षापर्यंत हजार रूपये, टॅक्सी वर बोझा चंडविणे 100 वरून 1500 रुपये, टॅक्सी विमा सन 2013-14 7200 वरून 13500, व्यवसाय कर व त्यावरील दंड हजार रूपयावरून 1.25 टक्के व्याज व प्रतिदिनी 2 व 5 रूपये दंड, टॅक्सी परमिट नूतनीकरण फी 200 वरून 5000 रुपये असा नवीन दर आकारण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात या आहेत मागण्या
युनियन मधील सर्व सुशक्षित बेरोजगार तरुणांनी परमिट काढून टॅक्सी व रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत आहोत त्यातूनच संसार चालवितो त्यात केंद्र शासनाने आमच्या टँक्सी व रिक्षा पासिंग, लायसन्स टॅक्सीवर बोझा परमिट नूतनीकरण यांची फी हि वाढविली असल्याने आम्हास ते मान्य नाही ती पूर्वी प्रमाणेच आकारण्यात यावी यासाठी एक दिवसीय बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला व तसे निवेदन अध्यक्ष अरुण केळकर, संजय पाटील, कैलास महाजन, सुभाष चौधरी, किशोर पाटील, यांच्या सह सर्व टँक्सी व रिक्षा चालक उपस्थित होते.