टॅब्लेट एज्युकेशनमध्ये भुसावळ जिल्ह्यात अग्रेसर

0

भुसावळ । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅब्लेट एज्यूकेशन या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात झाली असून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात 25 जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाल्या असून 12 शाळा डिजीटल शैक्षणिक साहित्य म्हणून टॅबचा वापर करत आहे. भुसावळ तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या संकल्पेतून सुरु झालेल्या टॅब्लेट एज्यूकेशन उपक्रम वेग धरत असून यात सहभागी शाळा व जनसंपर्क पाहता भुसावळ तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे.

या शाळांमध्ये होतोय टॅब्लेटचा वापर
जिल्हा परिषद शाळा कठोरा खु. 2 टॅब, खंडाळे – 1 टॅब, फूलगाव -2 टॅब, मोंढाळे – 1 टॅब, मिरगव्हाण -1 टॅब, निंभोरा बु. – 1 टॅब , जिल्हा परिषद शाळा दिपनगर टॅब – 2, जिल्हा परिषद शाळा सिद्धेश्वरनगर वरणगाव टॅब – 1, जिल्हा परिषद शाळा पिंप्रीसेकम टॅब – 1, जिल्हा परिषद शाळा जोगलखोरी टॅब -1, जिल्हा परिषद शाळा सुसरी टॅब – 1, जिल्हा परिषद शाळा तळवेल बॉइज टॅब -1 या शाळांमध्ये डिजीटल शैक्षणिक साहित्य म्हणून टॅबचा वापर केला जात आहे.

68 पैकी 25 शाळा डिजिटल
टॅब्लेट ऐज्यूकेशन उपक्रमासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत असून सुमारे 70 शिक्षकांनी दोन दिवसाचे तंत्रस्नेही प्रशिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 25 शाळा डिजिटल झाल्या असून आणखी दोन शाळा मधील प्रत्येकी 3 अशा सहा वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दोन्ही शाळांना प्रत्येकी 85 हजार रुपये जिल्हा स्तरावरुन प्राप्त झाले आहे.