टेंभीकुरण-चिखली रस्ता दुरुस्तीसाठी 14 लाख

0

यावल । टेंभीकुरण चिखली रस्ता दुरुस्तीसाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी 14 लाखांचा निधी दिला आहे. पालिकेचे गटनेते राकेश कोलतेंसह नगरसेवकांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता.

यावल शहरातील अनेक शेतकर्‍यांची टेंभी कुरण चिखली रस्त्यावर शेती आहे. प्रत्येकी तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने या परिसरातून शेतमालाची वाहतूक करतांना अतिशय अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राकेश कोलते, दीपक बेहेडे यांनी आमदार जावळे यांच्याकडे मागणी केली होती. यानुषंगाने शुक्रवारी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, धीरज महाजन, राजू फालक, ईश्वर पाटील, गोटू महाजन, बापू महाजन आदींनी आमदार जावळेंची भेट घेतली. या वेळी त्यांनी दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी सात, असे एकूण 14 लाख रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले.पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त होतील.