टेंम्पोच्या धडकेने फुले मार्केटसमारील डिपीतून ऑईल गळती

0

जळगाव । फुले मार्केटसमोरील इलेक्ट्रीक डिपीला सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास टॉवर चौकाकडे जाणार्‍या टेम्पोने धडक दिली. त्यामुळे ऑइल गळती झाली. रस्त्यावर ऑइल गळती झाल्याने रस्त्यावरील वाहने चालविण्यात अडचणी येत होत्या. या ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ अपघातही झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अनेकांनी या ठिकाणी अनेकांनी सापडेल त्या भांड्यात गळती होणारे ऑइल गोळा करून घेऊन गेले.

सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घाणेकर चौकाकडून येत असलेला टेम्पोने फुले मार्केटसमोर असलेल्या इलेक्ट्रीक डिपीला धडकला. डिपीला टेम्पो धडकताच काही सेंकदात त्यातून ऑइल गळती सुरू झाली. त्यानंतर टेम्पो चालका महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले. संपूर्ण रस्त्यावर रस्त्यावर ऑईल पसरले. या घटनेची माहिती महावितरण कर्मचार्‍यांना नागरिकांनी दिल्यानंतर कर्मचारी काही मिनिटातच दाखल झाले होते.

सांधेदुखीवर औषध
टेम्पोने डिपीला धडक दिल्यानंतर तत्काळ ऑइल गळती सुरू झाली. रस्त्यावरून येणार्‍या जाणांनी डिपीतील ऑइल गळती बघितल्यानंतर सापडेल त्या भांड्यात ऑइल भरण्यास सुरूवात केली. काहींनी लहान बादल्यांमध्ये, काहींनी बाटल्या, मगमध्ये ऑइल गोळा केले. ज्या नागरीकांना कोणतेच भांडे सापडले नाही त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत ऑइल भरून घेऊन गेले. डिपीचे ऑइल सांधे दुखीवर चांगले औषध असल्याचे सांगत नागरीकांनी ऑइल गोळा केले. सुदैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली नाही. शेवटी काही वेळाने ऑइल संपल्यानंतर गर्दी कमी झाली.