टेकचंदानी, खत्री यांनी खडसेंची सुपारी घेतलीय !

0

कल्पना इनामदार यांचे पत्रकार परिषदेत खळबजनक आरोप

मुंबई – भ्रष्टाचाराच्या नावाखाली 11 जणांची टीम असून याचे मुख्य सूत्रधार ललीत टेकचंदानी व राजेश खत्री आहेत. या टीममध्ये काही आयकर अधिकारी, सीए व वकीलही असून टेकचंदानी, खत्री व अनिश दमानिया हे चांगले मित्र आहेत, अशी माहिती देत ललित टेकचंदानी व राजेश खत्री यांनी एकनाथराव खडसेंची सुपारी घेतली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. टेकचंदानी यांच्या अनेक कंपन्या, इन्फ्रास्टकरच्या असून ते फायनान्स पुरविण्याचे काम करतात त्यांचे अमेरिका, सिंगापूर, पाकिस्तान, दुबई या ठिकाणी कार्यालये आहेत, यासह अनेक शॅडो कंपन्या आहेत. त्यामधू राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचा ब्लॅक पैसा व्हाईट करतो, याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचे इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मी अण्णांच्या आंदोलनाचा एक भाग असल्याने अंजली दमानिया वारंवार माझी खोटी बदनामी करीत असल्याचे इनामदार यांनी म्हटले असून दमानिया यांनी सर्व पेपर सार्वजनिक करावी, अन्यथा माफि मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासह माझ्याबरोबर अंजली दमानिया, त्यांचे पती अनिश दमानिया व बैठकीत असलेल्या इतरांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही इनामदार यांनी केली आहे. अंजली दमानिया त्यांच्या सोयीनुसार स्टेटमेंट बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.