पिंपरी : दिवंगत नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त मोहिनी टेकवडे व अविनाश टेकवडे मित्र परिवाराच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि स्मार्ट आधारकार्डचे वाटप करण्यात आले. तसेच मोफत वाहनांची पीयूसी तपासणी करण्यात आली. चिंचवड, मोहननगर येथील श्री साई संस्थान येथे सोमवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ नेते आझम पानसरे, नगरसेविका वैशाली काळभोर, संजय जगताप, विशाल यादव, आक्रम शेख, अजय भोसले, युसूफ खान, बाळासाहेब वाघेरे, अन्सार शेख उपस्थित होते. आझम पानसरे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे, स्मार्ट आधारकार्डचे वाटप करण्यात आले. मोफत पी.यु.सी. तपासणी करण्यात आली. दत्ता वाघमोडे, आप्पा भोसले, राजू खजिनदार, शिवा कदम, प्रकाश कासट, अश्विन अगरवाल, शकील शेख, शशिकांत खिलारे, हरेश महाजन, शशिकांत पाडाळे, अभिजीत वेगुर्णेकर, निखील ग्रोव्हर, सुनीता जोशी, चंदा तिकुटे, मनिषा गवळी, खैरणार तात्या यांनी संयोजनात पुढाकार घेतला.