शिरपूर । भारत सरकार टेक्सटाईल कमिशनर डॉ.कविता गुप्ता यांनी शिरपूर येथील टेक्सटाईल पार्कला भेट देवून पाहणी केली. आमदार अमरिशभाई पटेल यांच्याशी चर्चा करुन त्यांनीटेक्सटाईल पार्कची सविस्त्र माहिती जाणून घेतली. टेक्सटाईल पार्क व त्यातील अनेक कंपन्या पाहून त्यांनी खूपच समाधान व्यक्त केले. टेक्सटाईल कमिशनर डॉ.कविता गुप्ता यांनी गुरुवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी टेक्सटाईल पार्कला भेट दिली. तेथील सर्व कंपन्यांना त्यांनी भेट दिली. सर्व कंपन्यांमधील उत्पादनांची माहिती जाणून घेतली.
विविध योजनांची दिली माहिती डॉ. गुप्ता यांनी मुकेश पटेल सीबीएसई स्कूलमधील ऑडीटोरीअम हॉलमध्ये टेक्स्टाईल क्षेत्राविषयी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. पॉवर टेक्स् इंडिया, इपीएफ, यार्न बँक योजना, सामान्य् सुविधा केंद्र (सीएफसी), पंतप्रधान मुद्रा योजना (पी.एम.एम.वाय.ई.), टेक्स्- वेंचर कॅपिटल फंड, एटफ्स् योजना, कॅपिटल इन्व्हेस्टमेट सबसिडी (सी.आय.एस.), एस.पी.व्ही., गारमेंट / पारेल / मेड-अप्स् तसेच शासनाचे आर्थिक सहकार्य बाबतचे धोरण याबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधून माहिती दिली. मान्यवरांनी विचारलेल्या अनेक शंकांचे त्यांनी निरसन केले. यावेळी शिरपूर टेक्सटाईलमधील विविध कंपन्यांचे पदाधिकारी, धुळे येथील पॉवरलूमचे मालक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी 15 ते 20 मिनिटे ध्यान साधना घेतली. बुधवार दि. 5 एप्रिल रोजी डॉ. गुप्ता यांनी मालेगाव येथे सर्व लूम मालकांना मार्गदर्शन करुन विविध योजनांची त्यांना माहिती दिली. शिरपूर विमानतळावरुन विमानात बसून डॉ. गुप्ता यांनी हवाई सफर केली. हवाई पाहणीतून निरीक्षण करुन त्यांनी शिरपूर शहराबद्दल व टेक्स्टाईल पार्कची माहिती घेतली.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, डिशनल टेक्सटाईल कमिशनर बाला राजू, टेक्सटाईल कमिशनर रिजनल ऑफीस मुंबईचे डायरेक्टर नरेशकुमार, तांत्रिक अधिकारी शशांक पांडे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जनकभाई पटेल, विविध कंपन्यांचे प्रमुख, कैलासचंद्र अग्रवाल, गोपाल भंडारी, योगेश भंडारी, राजेंद्र देसले, डीसान इन्फ्रा टेक्सटाईल डायरेक्टर सुनिल मंडोरा, अतुल भंडारी, नितीन अग्रवाल, विनय भंडारी, विजय भंडारी, कमलेश अग्रवाल उपस्थित होते.