नवापूर । येथे 42 वी राज्यस्तरीय सिनिअर गट टेनिक्वाईट स्पर्धा 2017 घेण्यात आली. यास्पर्धैत मुंबई , जळगाव, सांगली, पुणे, भंडारा, नागपूर, नंदुरबार इतर टिमांचा सहभाग होता. या राज्यस्तरीय सिनिअर गट टेनिक्वाईट स्पर्धेत महाराष्ट्रातून द्वितिय क्रमांक नंदुरबार विभागाने पटकवला. यास्पर्धेत श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा 11 वी सायन्सचा विद्यार्थी अश्वीन भटू राजपूत याचा ही सहभाग होता. या द्वितिय क्रमांकाच्या विजयाबदल त्यास क्रिडा शिक्षक मयुर ठाकरे व राजेंद्र साळुके यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेतर्फे सत्कार
महाराष्ट्रात दुसर्या क्रमांचे सिल्वर मेडल व प्रमाणपत्र अश्वीनला मिळाले आहे. शाळेवर विजयाचा व कौतुकाचा झेंडा रोपला असून शाळेचे मुख्याध्यापक विनोदकुमार पाटील यांनी अश्वीनचा शाळेतर्फे सत्कार केला. यावेळी उपप्राचार्य एस. आर. पहुरकर, उपमुख्याध्यापक भरत पाटील, पर्यवेक्षक हरीश पाटील,पर्यवेक्षिका कमल कोकणी आदी उपस्थित होते. अश्वीन येत्या 2 वर्षात एकदा तरी महाराष्ट्राच्या टिममध्ये सुध्दा खेळेल असे प्रतिपादन प्राचार्य विनोदकुमार पाटील यांनी यावेळी केले. अश्वीन राजपूत याने शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला.