भुसावळ- जळगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची सभा नुकतीच झाली. त्यात ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय खेल मंत्रालय व युवक कल्याण द्वारा मान्यताप्राप्त व स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचार-प्रसार करणार असल्याचे कटलर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. कटलर यांना जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा.आमदार चंद्रकांत सोनवणे, संस्थेचे चेअरमन मोहन फालक, डॉ.प्रदीप तळवलकर, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, प्रदीप साखरे, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, गोपाल जोनवाल यांनी शुभेच्छा दिल्या.