जळगाव । टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असो. 19 वी ज्युनिअर व सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा 11 ते 13 ऑगस्ट 2017 दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ नागपूर येथे करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्हा संघटनाचे संघ सहभागी होणार आहेत. संघ निवडण्यासाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन 6 ऑगस्ट 2017 रोजी ला.ना. सार्वजनिक विद्यालय येथे सकाळी 10 वाजता करण्यात येईल. वयोगट – सब ज्युनिअर- 1 जानेवारी 2001 नंतरचा जन्म असावा. ज्युनिअर – जानेवारी 1999 नंतरचा जन्म असावा. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.