पुणे । आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी आयोजित 25000डॉलर रकमेचा पुरस्कार असणार्या पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईने युक्रेनच्या चौथ्या मानांकीत वालेरीया स्त्राखोवाचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, शिवछ्त्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत एक तास दहा मिनिट चाललेल्या सामन्यात भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईने युक्रेनच्या चौथ्या मानांकीत वालेरीया स्त्राखोवाचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. भारतच्या तिसर्या मानांकीत कारमान कौर थंडीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत मोन्टेनेग्रोच्या सहाव्या मानांकीत एना वेसेलीनोवीकचा 6-2, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसर्या मानांकीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने स्लोवाकीयाच्या आठव्या मानांकीत तेरेझा मिहालीकोवाचा 7-6(2), 6-2 असा टायब्रेकमध्ये पराभव केला.
दुहेरी गटात उपांत्य फेरीत चायनीज तैपईच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा या जोडीने भारतच्या झील देसाई व थायलंडच्या बुनयावी थामचायवात यांचा 3-6, 6-2, 10-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या दुसर्या लढतीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन व स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवा यांनी तुर्कीच्या बेरफु सेंग्झी व स्वित्झरलँडच्या करीन केनेल यांचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला.