चिखली ( प्रतिनिधी) – चिखलीतील शेलारवस्ती येथील टेन्को व्हीजन या कंपनीला रविवारी पहाटे दीडच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांच्या एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजलेले नसून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
तासाभरात आगीवर नियंत्रण
टेन्को व्हीजन कंपनीला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर याची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच तळवडे उप अग्निशामक केंद्र आणि संत तुकाराम नगर अग्निशामक मुख्यालय येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसी अग्निशामक दलाचाही बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांना तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.