टेन्ट हाऊस गोडावूनला आग; लाखोंचे नुकसान

0

तीन बंबांनी विझविली आग; परीसरातील नागरीकांची घटनास्थळी धाव
खेडीरोडवरील योगेश्वर नगरातील दुपारी 2.30 वाजेची घटना
जळगाव | योगेश्‍वर नगरात असलेल्या टेन्ट हाऊसच्या गोडावूनला शॉटसर्कींटमुळे अचानक आग लागल्याची घटना दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली असून या झालेल्या आगीत टेन्ट हाऊसमधील सर्व सामान जळून खाक झाले. क्षणातचं आगीने रौद्ररुप धारण केल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले असून दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

दिक्षीतवाडीतील घराला आग
जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील दिक्षीतवाडीतील शाम मणियार यांच्या घरात प्रभादिप एजन्सीजचे गोडावून आहे. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक याठिकाणी आग लागली. दरम्यान घर लाकडी व जुन्या पध्दतीचे असल्याने आगीने पेट घेतला होता. हे गोडावून प्राजक्ता संग्रात जोशी यांच्या मालकीचे असून २ अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली.

मिळालेली माहितीनुसार, रविंद्र सुकलाल बारी रा. पिंप्राळा यांचे जुना खेडीरोडवरील योगेश्‍वर नगरात जयभवानी टेन्ट हाऊस असून याच ठिकाणी गोडावून आहे. गोडावून दुपारी 2.30 वाजता बंदावस्थेत गोडावूनमध्ये असतांना अचानक वायर तुटल्याने शॉटसर्कींट झाला. दरम्यान शॉटसर्कींट झाल्यामुळे गोडावूनमध्ये आग लागण्यास सुरुवात झाली. काही वेळातच आगीचे लोळ निघत होते. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती रविंद्र बारी व अग्निशमन विभागाला दिली.

टेन्ट हाऊसचे साहित्य जळून खाक
शॉटसर्कीटमुळे गोडावूनला लागलेल्या आगीत प्लास्टीकच्या खुर्चा, पडदे, सिलींग पडदे, स्टेजचे बाकडे, लाकडी बांबु यासह लाखो रुपयांचे टेन्ट हाऊसचे साहित्य जळाले आहे. दरम्यान गोदावून हे पत्र्याचे असल्याने संपूर्ण गोडावून आगीत जळून खाक झाले आहे. आगीच्या घटनेची माहिती कळताच मनपाच्या अग्निशमन विभागाचा एक बंब सुरुवातीला घटनास्थळी दाखल झाला. या बंबातील पाणी संपल्यानंतर जवळपास २० मिनीटे एकही बंब घटनास्थळी न आल्याने आगीने पुन्हा पेट घेतला होता. त्यानंतर जवळपास मनपाचे ३ बंब, जैन इरिगेशनचे २ बंब व १ खाजगी बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

तरुणांकडून शर्थीचे प्रयत्न
आग विझविण्यासाठी परिसरातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान ज्ञानदेव नगरातील अष्टभुजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी अष्टभुजा मंडळाचे कार्यकर्ते नयन राणे यांनी पत्र्याचे शेड तोडून आग विझविणार्‍यांना मदत केली.

घटनास्थळी आ.भोळे यांची भेट
घटनेची माहिती कळताच आ. राजुमामा भोळे, नगरसेवक प्रविण कोल्हे, विश्‍व हिंदू परिषदेचे ललीत चौधरी, माजी नगरसेवक लिलाधर सरोदे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. यावेळी परिसरातील नगरसेवक प्रविण कोल्हे यांनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला.