विरार । द्वितीय पालघर जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा वसई येथील दत्ताणी मॉल मध्ये दोन दिवस खेळवल्या गेल्या. या स्पर्धात आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर अथर्व कुलकर्णी याने मुलांच्या सब जुनिअर आणि जुनिअर गटात अजिंक्यपद पटकावून दुहेरी मुकुट मिळवला, तर संजय पाटणकर याने पुरुष एकेरी गटात विजेतेपद पटकावले. अॅटम स्पोर्ट्स, रीस्पिन, दत्ताणी मॉल आणि डी सी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील १२५ खेळाडूंनी भाग घेतला.
ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य टेबलटेनिस असोसिएशनचे मानद-सेक्रेटरी यतीन टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सायंकाळी झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास पालघर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे आणि प्रज्ञा कुलकर्णी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होत्या.