टेम्पोमुळे पादचार्‍याचा मृत्यू

0
चाकण : भरधाव वेगात जाणार्‍या टेम्पोने रस्त्याने पायी जाणार्‍या पादचार्‍याला धडक दिली. त्यामध्ये पादचार्‍याचा मृत्यू झाला. हा अपघात
सोमवारी (दि. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास तळेगाव चाकण रोडवर झाला.
युनूस सैफुल्ला पठाण (वय 39, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप रामदास वारे (रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख सैफुल्ला पठाण (वय 33, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यू
झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे.