टेम्पोला आग

0

राजगुरूनगर । पुणे-नाशिक महामार्गावरून रिकामे सिलेंडर घेऊन जाणार्‍या टेम्पोने शनिवारी सकाळी 6 वाजता अचानक पेट घेतल्याने सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

टेम्पो क्रमांक एम एच 16 क्यू 3551 हा सिन्नर येथून रासे येथे सिलेंडर भरण्यासाठी चालला होता. पुणे-नाशिक महामार्गवरील शिरोली टोलनाका पार केल्यानंतर लुणावत गॅस एजन्सी गोडाऊन समोर आल्यावर गाडी अचानक थांबली व जागीच धूर सोडू लागली. वायरिंगमध्ये शॉटसर्किट झाल्याने टेम्पोला आग लागली. चालक रमेश घेवडे याने बचावासाठी टेम्पोतून उडी मारली.