महाड । मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ जुन्या सावित्री पुलावर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला टेम्पो आणि एसटी या दोन वाहानांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये टेम्पोचा चालक जागीच ठार झाला. तर एसटी बसमधील 35 प्रवासी जखमी झाले. अपघातातील सर्व जखमींवर महाड येथील ट्रामा केअर युनिटमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताची नोद महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महाडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्घटनाग्रस्त सावित्री पुलाशेजारी असलेल्या जुन्या पुलावर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला पोलादपूरकडून महाडकडे भरधाव वेगाने येत असलेला टेम्पो क्रमांक एमएच 6/बीडी/0782 जुन्या पुलावरुन चुकीच्या मार्गाने महाडकडे येत होता. त्याच वेळी एसटी बस क्रमांक एमएच 20बीएल /8032 गुहागरकडे जात होती. टेम्पोचालक चुकीच्या मार्गाने समोरुन भरधाव वेगाने येत असल्याचे एसटीचालकाने पाहिल्याबरोबर त्यांनी एसटी वाचविण्याचा प्रयत्न केला.
क्रेनच्या सहाय्याने वाहने हटवली
महाडजवळ जुन्या सावित्री पुलावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्वरीत पोलिसांची क्रेन अपघाताच्या ठिकाणी आणल्यानंतर त्वरीत अपघातग्रस्त वाहने पुलावरुन हटविण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळांतच पूर्ववत करण्यात आली. या अपघाताचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मधाळे करीत आहेंत.
भरधाव वेगाने येणार्या टेम्पोची समोरुन धडक बसल्याने टेम्पोचालक नवीन अब्बास वास्ता (रा.मेटकरणी, ता.श्रीवर्धन) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एसटीतील 35 प्रवासी जखमी झाले. अपघातामधील जखमींमध्ये सुशांत सुरेश आंब्रे (27 रा.चिरणी, ता.खेड), रेखा राजाराम चाळके, (27 रा.पिरलोटे, ता.खेड), कस्तुरी काशिनाथ अजवळकर (45 रा. बोछया-कारोळ, ता.गुहागर), प्राची प्रशांत जाधव (27 रा.कवडर ताम्हाणे ता.चिपळूण), प्रशांत दिलीप जाधव (27 रा.कवडर बुध्दवाडी, ता.चिपळूण),संदीप विठ्ठल जाधव (45 रा.डोडवली ता.गुहागर), मुफीला अल्ताफ केळकर (27 रा.सुरळ ता.गुहागर), दिपक बाबू उतेकर, (61 रा.कुर्ला, मुंबई),अंजना सखाराम उतेकर (80 रा.भरणानाका, ता.खेड), सिताराम दत्तात्रय नलावडे (57 रा.भरणानाका,ता.खेड), सावित्री सदाशिव काताळकर (66 रा.शृंगारतळी ता. गुहागर), ज्ञानेश्वर सोमा सोनकर,(20 रा.शृंगारतळी ता.गुहागर), सुनीता सुरेश घडवले (65 रा.आरेगाव,ता.गुहागर), सुनीता रघुनाथ दहिवलकर (68 रा.अडूर ता.गुहागर),चंद्रभागा विठू सैतवडेकर (58 रा.कारुळ ता.गुहागर),एकनाथ तुलाजी सैतवडेकर (61 रा.कारुळ ता गुहागर),सुषमा एकनाथ सैतावडेकर (50 रा.कारुळ, ता.गुहागर),सुप्रिया सुभाष सुर्वे (40 रा.रानवी ता.गुहागर),अश्विनी चंद्रकांत सातवे (40 रा.शांताराम तलाव मालाड, मुंबई), दत्ताराम बाळू सोलकर (65 रा.विरार,पालघर), सुनीता अनंत शिर्वे (70 मालाड मुंबई),शरद अनंत शिर्वे (42 रा.मालाड मुंबई), दिपाली महेंद्र कदम (17 रा.आंबेरे ता.चिपळूण),भाऊ सदाशिव चव्हाण (रा.आंबेरे),सुरेश धोंडू माळी (60 रा.खेर्डी वरची पेठ चिपळूण),संतोष लक्ष्मण कदम (45 रा.घुगे, ता.चिपळूण), नूरमहमद इब्राहिम लालू (70 रा.सुरल ता.गुहागर),दिलीप महादेव मनवल (44 मालाड, मालवणी चर्च राठोडीगाव), सुधाकर अमृतलिंग जंगम (78 रा.विरार पालघर), खातून नुरमहोमद लालु (65 रा.सुरल ता.गुहागर),संदेश सुरेश माळी (32 रा.खेर्डी वरची पेठ ता.चिपळूण), दर्शना दिलीप मनवल (39 रा.मालाड,मालवणी चर्च राठोडीगाव), त्रिवेणी सुशिल पारधी (3 रा.कारुळ ता.गुहागर),राजेश गणपत वसावे (41, बसवाहक, गुहागर डेपो),मुक्तार वझीर सय्यद (33, बसचालक, गुहागर डेपो) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. सर्व जखमींवर महाड येथील शासकीय ट्रामा केअर युनिटमध्ये उपचार करण्यांत येत आहेंत.