टेरेसवरील शहरी शेतीला चळवळीचे स्वरुप यावे…

0

जळगाव । किटकनाशकाच्या अतीवापरामुळे बाजारातील भाजीपाला व फळे यांच्या दर्जाबाबत खात्री राहिलेली नसतांना, टेरेसवर सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला पिकविणार्‍या शहरी शतकर्‍यांचे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे. ही चळवळ आणखी व्यापक व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी किचन गार्डन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी केले.

यांची होती उपस्थिती
येथील टेरेस व्हेजीटेबल गार्डनर गृप व बालविश्‍व स्कूलचे विद्यमाने पत्रकार भवनात किचन गार्डन प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर , गृपचे एडमिन जितेंद्र पाटील, संचालक भारती चौधरी, परिक्षक कृषी उपसंचालक अनिल भोकरे, शैलेद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रदर्शनात विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले, सेंद्रीय भाजीपाला तसेच आकर्षक बोन्सायच्या झाडांनी बहरलेल्या कुंड्या ठेवल्या होत्या. किचनमधील टाकाऊ कचरा कुचवून हिरवळ फुलविणार्‍या 23 स्पर्धकांनी सहभागी नोंदविला. शहरातील नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

किचन गार्डन प्रदर्शन स्पर्धेतील विजेते
समीर सरकार, दिपीका चांदोरकर, श्यामसुंदर कलभंडे, अलका अट्रावलकर, विरेंद्र जाधव, सुनिता नेहेते, विकास देशमुख, ज्योती साळुंखे, मोहन नेवे आदींना सेंद्रीय पध्दतीने टेरेस गार्डनद्वारे फळे, फुले व भाजीपाला निर्मिती केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ संचालिका अ‍ॅड. अंजली कुलकर्णी, हेमंत पाटील, जितेंद्र