टेरेस गार्डनतर्फे ‘वर्ल्ड कीचन गार्डन डे’

0

जळगाव। येथील निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत घरच्या घरी सेंद्रीय भाजीपाला व फळे, फुलेप्रेमी बाग पुरविणार्‍या ध्येयवेड्या ‘टेरेस गार्डन डे‘ ग्रुपतर्फे आज दि. 27 रविवारी ‘वर्ल्ड कीचन गार्डन डे’ निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सेंद्रीय पध्दतीने घरच्या घरी फळबाग, फुलबाग तसेच पालेभाज्या पिकविणार्‍या निसर्गप्रेमीसाठी दोन प्रकारात स्पर्धा होतील.

अशी होणार स्पर्धा
संपूर्ण जगभरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘वर्ल्ड कीचन गार्डन डे’ चे आयोजन केले जाते. याचाच भाग म्हणून जिल्हा पत्रकार संघात अ‍ॅड. अंजली कुलकर्णी, हेमंत पाटील, जितेंद्र पाटील आदी पर्यावरणप्रेमींच्या समुहातर्फे कीचन गार्डनप्रेमीसाठी सेंद्रीय फुलझाडे बोन्साय व सेंद्रीय भाजीपाला अशा दोन प्रकारात स्पर्धा होणार असून दु. 1 ते 2 या वेळेत नावनोंदणी व दु. 3 ते 6 प्रत्येकी दोन कुंड्याचे प्रदर्शन होणार आहे. उपक्रम बालविश्‍व इंग्लिश स्कूलचे सहकार्याने होणार असून सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल तरी ऑरगॅनिक पध्दतीने घरगुती भाजीपाला व फुलेफळे लागवड करण्यार्‍या निसर्गप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन टेरेस गार्डनर तर्फे अ‍ॅड. अंजली कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9890279548 येथे संपर्क साधावा.