जळगाव । नाशिक विभागातील चार जिल्ह्यामधील खेळाडूंना मैदानी खेळाचे चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी नाशिक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परीषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टे्रेन द ट्रेनर’ हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असुन याद्वारे उत्कृष्ट प्रशिक्षक घडविले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यासाठी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक यांना दहा दिवस प्रशिक्षण देण्यात येणार असून उद्योन्मुख खेळाडू कसे घडवावे याविषयी शिबीरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय खेळाडूंसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी कमीत कमी 18 वर्षे वयोमर्यादा आवश्यक आहे.