टे.टे.: श्रेया देशपांडेला तिहेरी मुकुट

0

ठाणे । नुकत्याच पार पडलेल्या जिंदाल ठाणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ज्युनिअर गटातील श्रेया देशपांडेने महिला, युथ आणि ज्युनिअर मुलींच्या गटाच्या विजेतेपदासह तिहेरी मुकुट संपादन केला. तर सिद्धेश पांडेने विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या सनीश आंबेकरचा पुरुष आणि युथ गटात पराभव करत दुहेरी यश संपादन केले. श्रेयाने महिला आणि युथ गटात डावखूर्‍या श्रृती अमृतेचा पराभव केला. महिलाच्या अंतिम लढतीत श्रेयाने श्रृतीची लढत 11-5, 7-11, 14-12, 9-11, 8-11, 12-10, 14-12 अशी मोडून काढत दुसरे विजेतेपद निश्‍चित केले. त्यानंतर श्रेयाने पुन्हा एकदा श्रृतीवर युथ गटात सरशी मिळवताना 11-6, 11-9, 9-11, 4-11, 11-6, 7-11, 11-7 असा
विजय नोंदवला.

या दोन अंतिम लढतीआधी झालेल्या ज्युनिअर मुलींच्या निर्णायक लढतीत श्रेयाने दिशा हुलावलेचा 11-6, 11-5, 11-6, 11-5 असा पराभव केला. मुलांच्या युथ गटातील सनिश विरुद्धच्या अंतिम लढतीत सिद्धेश 0-2 असा पिछाडीवर पडला होता. पण त्यानंतर सिद्धेशने सनिशची लढत 8-11, 9-11, 11-7, 9-11, 11- 9, 12-10,11-9 अशी मोडून काढली. पुरुष गटाच्या अंतिम लढतीत मात्र सिद्धेशला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. हा सामना सिद्धेशने 11-7, 9-11, 11-4,11-8, 11-4 असा जिंकला.

इतर निकाल :
ज्युनिअर गट : मुले : दीपीत पाटील विजयी विरुद्ध जितेंद्र यादव 11-4, 11-6, 11-1, 11-4. कॅडेट गट मुली : आर्य सोनगडकर विजयी विरुद्ध पूनम यादव 11-5, 11-7,8-11, 11-9, 11-6. मुले : दीपीत पाटील विजयी विरुद्ध कौशल देशवंडीकर 11-5, 11-3, 11-3, 11-7. कॅडेट गट मुली : आर्या सोनगडकर विजयी विरुद्ध साची दळवी 11-4, 11-3, 11-8. मुले : गौरव पंचांगम विजयी विरुद्ध सिद्धांत देशपांडे 12- 10, 11-9, 11-13, 9-11, 11-8.