नंदुरबार। तालुक्यातील शिंदे येथील मोबाईल टॉवरचे ऑपरेटरने राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना काल घडली. शिंदे या गावात एका मोबाईल टॉवरसाठी महेश विनायक पाटील वय 35 वर्ष हा तरूण ऑपरेटर म्हणून काम पाहत होता.
राहत्या घरातच त्याने गळफास घेवून आत्महत्त्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्त्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत राहुल अशोक वाघ यांनी उपनगर पोलिस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मोरे हे करीत आहे.