एक जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार
जळगाव- मूर्ती घेण्यासाठी आलेल्या दोन तरुण हे भांडण करणार्यापैकी असल्याचा गैरसमज करत ढोल-ताशा वाजविणार्या 10 ते 15 जणांनी दोघां तरुणांनी ढोल-ताशांनी बेदम मारहाण केल्याची घटना सायंकाळी 5.25 वाजेच्या सुमारास टॉवर चौकात घडली. यात घटनेत रोहित विजय सपकाळे वय 20 रा. शिवाजीनगर, असे जखमी तरुणाने नाव असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवाजीनगर परिसरातील रोहित विजय सपकाळे हा मूर्ती खरेदी करण्यासाठी टॉवर चौकात आला यावेळी याठिकाणी वाद्य वाजविणार्या मुलांचे भांडण सुरु होते. त्यातील 10 ते 15 जणांना काही कारण न नसतांना माझ्या हातावर ढोल-ताशा मारुन फेकला. यात रोहितच्या हातातील 13 हजार रुपये किमतीची मोबाईल खाली पडला.
मूकबधीर तरुणाच्या डोक्यात पडले चार टाके
याचठिकणी स्वप्निल मंगल सोनवणे वय 22 हा मुकबधीर तरुण उभा होता, संबंधित दहा ते 15 जणांनी त्याच्याही डोक्यात ढोल मारुन फेला, यात स्वप्निला डोक्यात गंभीर दुखापत झाली असून चार टाके पडले आहे. तक्रारीसाठी रोहित याने स्वप्निलला सोबत घेत शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी मेमो दिला. जखमी रोहित सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन 10 ते 15 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे ढोल-ताशाही जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे करीत आहेत.