भुसावळ : जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात टोकरे कोळी, ढोर कोळी, कोलचा व कोलघा या जमातीचे वस्तीस्थान मोठ्या प्रमाणात आहे. यापैकी टोकरे कोळी ही जमात अनुसुचित जमातीत मोडते. मात्र त्यांना जात प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने शासनाने यासंदर्भाच्या अडचणी दूर करण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे. याबाबत कोळी समाजबांधवांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची भेट घेवून त्यांना या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.
शासनाने अडचणी दूर कराव्यात
यात नमूद करण्यात आले की, राष्ट्रपतींनी अनुसुचित जाती व जमातीमध्ये पुर्व आणि पश्चिम खान्देश म्हणजेच जळगाव, धुळे, नंदूरबार यामध्ये ढोर कोळी, टोकरे कोळी, कोलघा व कोलचा या जमाती दाखविल्या आहे. अनुसुचित जमाती महाराष्ट्र कायद्यामध्ये देखील याचा उल्लेख दिसतो. मात्र येथील समाजबांधवांना टोकरे कोळी प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शासनाने या बाबी लक्षात घेवून जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या अडचणी दूर करण्याची मागणी प्रदेश अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, युवा अध्यक्ष दिपक सोनवणे, अॅड. प्रल्हाद तायडे, अॅड. वसंत भोलाणकर, विशाल सुर्यवंशी, विनोद कोळी, जयवंत तायडे, सोपान कोळी, अशोक कोळी, सागर कोळी, संजय सोनवणे, कोमल कोळी, गोटू कोळी, निलेश कोळी, गोविंद कोळी, योगेश कोळी, किरण तावडे यांनी केली आहे.