टोकरे कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र प्राप्त

0

धुळे। न्याहाळोद येथे आदिवासी विकास संघाच्या वतीने आदिवासी टोकरे कोळी मागदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी लखीचंद बाविस्कर (चोपडा) होते. आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा मोतीलाल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले की 26 जानेवारी 1950 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना अंमलात आली. 2011 च्या जनगणनेनुसार धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत सर्वाधित टोकरे कोळी,कोळी महादेव,कोळी मल्हार यांची वस्ती आहे. म्हणून सर्वांनी अनुसूचित जमातीचेच दाखले घ्यावे असे आवाहन प्रा, सोनवणे यांनी केले.

’आदिवासी’ शब्दाचा उल्लेख करण्याच्या सूचना
हिंमत निकुम व हेमंत ईशी यांनीही मार्गदर्शन केले, ते म्हणाले की कोळी ढोर किंवा टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासींनी जातप्रमाणपत्रासाठी जास्तीत जास्त अर्ज करावे व दाखले पदरात पाडून घ्यावेत. आदिवासी जमिनधारकांच्या जमिनींच्या अधिकार आभिलेखात त्यांच्या नावापुढे ’आदिवासी’ शब्दाचा उल्लेख करण्याची पुन्हा एकदा सुचना परिपत्रकाद्वारे सर्व विभागीय आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणून कोळी ढोर किंवा टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासींनी सातबारा उतार्‍यांवर आदिवासी म्हणून नोंद करावी 7 डिसेंबर 2015 रोजी धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल सोनवणे यांच्या मागदर्शनाने आदिवासी विकास संघ सरचिटणीस महेंद्र देवरे यांना 11 कोळी ढोर जमातीचे जात प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर आदिवासी विकास संघ सचिव संदिप येळवे यांना 4 कोळी ढोर जमातीचे जात प्रमाणपत्र प्राप्त झाले. याप्रसंगी हेमंत ईशी, दिपक शिरसाठ, संतोष महाले, डॉ.सुरेश कोळी, विनोद शिंदे, हिंमत निकुम, कैलास कोळी, देविदास नवसारे, गणेश शिरसाठ, शामराव कोळी, मनोज कोळी,अर्जून कोळी,राहूल कोळी, प्रभाकर वाघ, पोपट वाघ, विकास शिरसाठ, भाईदास सोनवणे, शिवा शिरसाठ, नाना शिरसाठ, महेंद्र चव्हाण असे अनेक मान्यवर उपस्थित होते.