भिवंडी (रतनकुमार तेजे ) – भिवंडी शहर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करून सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गास वेठीस धरणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीवर राज्य शासनाने कारवाई करावीयासाठी आज भिवंडी ग्रामविकास समितीच्या वतीने आठरा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन टोरेंट पॉवर कंपनीच्या गलथान व मनमानी कारभाराचा निषेध केला.
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात वीज पुरवठा व वीज बिलाची वसुली करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या वतीने शहर व परिसरात वारंवार वीज भारनियमनाच्या नावाखाली १० ते १२ तास वीज पुरवठा खंडित करून नागरिकांसह व्यापाऱ्यांना हैराण केले जात आहे मीटर रीडिंग येग्यपद्धतीने न घेता मनमानी पद्धतीने जास्त रकमेची वीज बिल पाठवून ग्राहक व्यापाऱ्यांना छळले जात आहे तसेच अनेकांवर वीज चोरीचे खोटे गुन्हे दाखल करून ग्राहकांना दमदाटी करण्याचा प्रकार टोरेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो या बाबत तक्रारी करून सुद्दा दुर्लक्ष केले जाते त्यामुळे शहर व ग्रामीण भागात नाराजीचे सूर उमटत आहेत टोरेंट पॉवर कंपणीवर राज्य शासनाने कारवाई कारवी या मागणी साठी आज सकाळी भिवंडी ग्रामविकास समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मूक निषेध मार्च काढण्यात आला टोरेंट कंपनीच्या मनमानी कारभार बंद करावा ,शासनाने कंपनाच्या कारभाराची चौकशी करावी ,ग्राहकांवर दाखल केलेले वीज चोरीचे गुन्हे मागे द्यावे वीज कपात भारनियमन बंद करावे नवीन मीटर ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे वीज पुरवठा बंद झाल्याची तक्रार आल्यास त्याचे त्वरित निवारण करावे ,शाळा मंदिर ,स्मशानभूमी याना सवलती दारात वीज द्यावी अशा विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ सुरेश थिटे याना देण्यात आले या मोर्च्यात भिवंडी सह कशेळी ,काल्हेर ,कोपर ,केवणी -दिवे ,गुदवली, दापोडा ,दिवे -अंजूर ,वळ ,वेहले ,माणकोली अशा आठरा ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ ,सरपंच ,सदस्य ,गावकरी ,,महिला वर्ग मोठया प्रमाणात सहभागी झाले होते