चाळीसगाव । चाळीसगाव येथील औरंगाबाद – धुळे बायपास वरील टोल नाक्यावर चाळीसगाव शहर वाहतूक शाखेच्या काही कर्मचार्यांची दबंगिरी सुरु असून वाहनांची कागदपत्रे तपासण्याच्या कारणावरून वाहन चालकांना त्रास दिला जात असून काही चालकांना तर अक्षरश मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हा टोल नाका भारत पाकिस्तानची बॉण्ड्री आहे कि काय ? असे या ठिकाणी घोळक्याने जमून असलेल्या वाहतूक कर्मचार्यांच्या उपस्थितीमुळे दिसून येत आहे. तरी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने शहर पोलीस वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली आहे. या शाखेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली यामुळे वाहतूकीच्या कोंडीवर आळा बसणार आहे.
जहागिरी असल्यासारखा 3 पोलीस कर्मचार्यांचा समावेश : औरंगाबाद । धुळे बायपास महामार्गावर वरील कन्नड रोड, धुळे रोड बायपास व खडकी बु गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर वाहतूक पोलीस म्हणजेच अधिकृतपणे जहागिरी असल्यासारखे 3 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी असतात व येणारी वाहने अडवून त्यांच्या कडून कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली त्यांना त्रास देऊन त्यांची ड्रायविंग लायसन्स व वाहनांची कागदपत्र ताब्यात घेऊन त्यांना वेठीस धरल्या जाते व वाहनाचे वजन, तयार मधील हवा, हॉर्नचा आवाज, सीट बेल्ट व इतर कारणे देत आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत आपल्यावर कारवाई करावीच लागेल असे सांगून त्यांची अडवणूक केली जाते. त्याच प्रमाणे बाहेर राज्यातील वाहनांमध्ये स्वयंपाकाच्या वस्तू दिसल्यास त्यांना तर दोन देशांच्या सीमेवर असल्याप्रमाणे जाणीव पूर्वक त्रास देऊन त्यांच्या कडून वाटेल ती मागणी केली जात असल्याचे आता उघड पणे बोलले जाऊ लागले आहे.
चालकांनी विरोध केल्यास धरतात वेठीस : प्रत्येक वाहनाचे कसून तपासणी करणे हि कायद्याची बाब असून अश्या तपासणीला कोणीही विरोध करण्यात नाही मात्र जाणीवपूर्वक त्रास देऊन व वाहन चालक आणि इतर प्रवाशांना वेठीस ठरून त्यांचा वेळ वाया घालून त्यांना त्रास देणे हे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. वाहन चालकांना वेठीस ठरल्यावर आणि त्यांना तेथून निघण्याची घाई असताना ते काहीही करून आपल्या मागण्या मान्य करतात म्हणून सदर कर्मचारी हे जाणीवपूर्वक वाहने अडवून त्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे औरंगाबाद-धुळे बायपास वरील खडकी बु गावाजवळील टोल नाका हा चाळीसगाव तालुक्यात आहे अथवा भारत पाकिस्तानच्या सीमेवर आहे असे या पोलिसांच्या वर्तणुकीवरून दिसून येत आहे. वेठीस धरल्या जाते व वाहनाचे वजन, तयार मधील हवा, हॉर्नचा आवाज, सीट बेल्ट व इतर कारणे देत आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत आपल्यावर कारवाई करावीच लागेल असे सांगून त्यांची अडवणूक केली जाते. त्याच प्रमाणे बाहेर राज्यातील वाहनांमध्ये स्वयंपाकाच्या वस्तू दिसल्यास त्यांना तर दोन देशांच्या सीमेवर असल्याप्रमाणे जाणीव पूर्वक त्रास देऊन त्यांच्या कडून वाटेल ती मागणी केली जात असल्याचे आता उघड पणे बोलले जाऊ लागले आहे.
काहींमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन
चाळीसगाव शहरात शहर वाहतूक पोलीस शाखेची निर्मिती झाल्यापासून वाहतुकीची कोंडी आता होत नाही. सपोनि सुरेश शिरसाठ यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी अनेक उपक्रम शहरात राबविले आहेत. त्यामुळे वाहतुकीला वळण तर लागले मात्र रस्त्याच्या दुतर्फा बाजूला होणारे अतिक्रमण देखील निघून रस्ते मोकळे झाले आहे अशी चांगली कामगिरी करीत असतांना मात्र टोल नाक्यावर दबंगिरी करणार्या अशा पोलीस कर्मचार्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मालिन होत असल्याचे दिसून येत आहे. तरी अश्या कर्मचार्यांना टोल नाक्यावर ड्युटी देऊ नये तसेच त्यांची चौकशी करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.