टोलवसुली एप्रिल २०३० पर्यंत कायम राहणार आहे:चंद्रकांत पाटील

0

मुंबई– पुणे द्रुतगती मार्गावरील टोल वसुलीबाबत भाष्य करण्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला. तुम्ही नंतर राम कदमचा प्रश्न विचाराल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी टोलच्या प्रश्नावर ‘टोलवाटोलवी’ केली.

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील खर्च वसूल झाला असला तरी या मार्गावरील टोलवसुली एप्रिल २०३० पर्यंत कायम राहणार आहे. या महामार्गावर कोणत्याही वाहनांना टोलमधून सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मंगळवारी मुंबई हायकोर्टात मांडली होती.

बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे लोणावळा येथे आले होते. विविध कामांच्या भूमिपूजन सोहळ्यास ते आले होते. याप्रसंगी त्यांना टोलबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्हीनंतर राम कदमांवर प्रश्न विचाराल, असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.