माहिती अधिकारात बाब उघड ; रीटर्न टोल भरण्याची गरज नाही
भुसावळ- टोल एकदा टोल टॅक्स भरल्यानंतर त्याची वैधता 24 तास असल्याने पुन्हा रीटर्न टॅक्स या कालावधीत भरण्याची आवश्यकता नसल्याची माहिती माहिती अधिकारात शहरातील माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डी.एम.ललवाणी यांना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. ललवाणी यांनी टोल नाक्यावर टोल भरल्यानंतर त्याची वैधतेबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालय, अमरावती येथील जनरल मॅनेजर तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व्ही.पी.ब्राह्मणकार यांनी त्यांना दिलेल्या उत्तरानुसार एकदा भरलेली फी (टोल टॅक्स) हा जाण्या-येण्यासाठी 24 तास वैध असतो. यासाठी संबंधित विभागाने त्यांना सडक परीवहन और राजमार्ग मंत्रालय यांचे 19 जुलै 2012 चे भारत का राजपत्र सबळ पुराव्यादाखल दिले आहे.
वाहनधारकांनी जागृत व्हावे
या संदर्भात प्रा.डी.एम.ललवाणी यांनी सांगितले की, बर्याचदा वाहनधारकांना या नियमाची माहिती नसल्याने ते टोल भरताना रीटर्नचा भरतात मात्र एकदा जर टोल भरला तर किमान त्याची मुदत 24 तास असल्याने पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले.