शहादा । राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे चिञ दिसून येत आहे. त्यातीलच एक म्हणजे ’जननी शिशू सुरक्षा ’ कार्यक्रमाअंतर्गत 102 क्रमांकाची रूग्नवाहिका सेवा. परंतु सध्या ही सेवा अनियमित झाल्याने विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या फटका बसत आहे. 102 क्रमांकावर फोन केल्यास गरोदर मातेचे पुर्ण नाव, खेप, गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र,तालुका,जिल्हा याबदल सविस्तर विचारणा करण्यात येते. तसेच आपण प्रतीक्षा करा. आपला संपर्क रूग्णवाहिका चालकांशी करून देण्यात येत आहे असे सांगण्यात येते व थोड्या वेळाने परत सांगण्यात येते की अतिदुर्गम भाग असल्याने चालकाशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे रूग्णाच्या नातेवाइकांचा भ्रमनिरास होत असल्याची अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येत आहे.
102 क्रमांकाची रूग्णवाहिका
जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात गरोदर मातेची घरापासून दवाखान्यात पर्यंत बाळंतपणासाठी येण्या जाण्याची व्यवस्था होणार्या विविध चाचण्या, औषधोपचार, जेवन, शस्त्रक्रिया या सर्व सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत. या सुविधा मिळविण्याकरीता रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी टोल फ्री क्रमांक 102 ची व्यवस्था करण्यात आली असून या दूरध्वनीवर संपर्क साधताच ही सेवा उपलब्ध होण्यासाठी रूग्नवाहिका हजर होतं
असते.
108 क्रमांकाची रूग्णवाहिका
अमेरिकेत 911 या ईएमस ( इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस) च्या धर्तीवर आपल्या राज्यांत टोल फ्री 108 क्रमांकावर आपत्कालीन डॉक्टर तसेच तांत्रिक उपकरणांसह दाखल होते. एकी कडे शासन अति दुर्गम भागात विविध योजना आनत आहे पंरतु त्या अमलबजावणी होताना दिसत नाही. एकी कडे शासनाने सुरक्षित मातृत्व, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी कंबर कसली असून रूगणवाहिकांच्या अनुपलब्धते मुळे एखादी माता बालक दगावल्यास त्यास जबाबदार कोण ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिदुर्गम भागात सेवा नाही
याउलट 108 रूग्णवाहिकेस फोन केला असता आस्थेवाईकपणे चौकशी करण्यात येउन डॉक्टरसमवेत रूग्णवाहिका दाखल होऊन संदर्भसेवेसाठी नेताना लगेचच घेऊन जात असल्याची दिसून येत आहे.102 रूग्णवाहिकांचे चालक अति दुर्गम भागात असतात तर 108 वाले चालकही त्याचं भागात सेवा देतात मग संपर्कात तफावत का असा सवाल सातपुड्यातील लोकांना पडला आहे.102 चा भरवशावर अनेक महिलांनी आपले जिव गमवला तर अनेक महिलांनी आपल्या येणार्या बाळाचे चेहरा पण पाहिला नाही.त्यामुळे परिसरातून 102 सेवा ही प्रभावीपणे राबवावी अशी मागणी होतं आहे.