उस्मानाबाद । समाजातील विविध घटकांतील नागरीकांना समाजकंटक, चोर, लुटारु यांचा त्रास होतात ते न्यायासाठीची पहिली पायरी म्हणून पोलिसात जातात, मात्र या खात्यातील काही जण आपल्या कर्तव्याला लाथाडत पैशासाठी कुठलेही पाऊल असल्याच्या दर्शवणार्या घटना घडल्याचे दिसून येते. अशीच घटना आता उस्मानाबाद जिल्ह्यात घडली असून
व्यापार्यांना लुटणार्या आंतरराज्य टोळीतेथील चार पोलिसही सहभागी असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे चौघांपैकी एका पोलिसाकडून तब्बल 42 लाखाची रोकड हस्तगत के ली आहे. जिल्ह्यातील व्यापार्यांना लुटणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी ज्या व्यापार्याला ताब्यात घेतले होते त्याचा आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटला असल्याने त्या दिशेने तपास होत आहे.
गेल्या 18 जूनच्या मध्यरात्री मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडीजवळ जीप आडवी लावून हैदराबादचा व्यापारी किर्तीकुमार जैन रस्ता अडवला होता.त्यानंतर त्यांनी व्यापार्याकडील रोकड लांबवली होती. यावेळी कारचालकाने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने पोलिसांनी जैन यांना चौकशीसाठी आणले होते, त्यावेळी त्यांनी 4 लाख लुटल्याची तक्रार दिली होती. नळदुर्ग पोलिसांनी ड्रायव्हरची चौकशी करुन एकाला अटक केली होती. पुढे या प्रकरणात पोलीस निरीक्षक अनिल किरवाडे यांच्यासह चार पोलिसांचा सहभाग उघड झाला.