जळगाव। चिंचोली गावाजवळ महामंडळाच्या एसटी बसला 5 फेबू्रवारी 2011 रोजी समोरून ट्रकने धडक दिली होती. यात प्रमोद बन्सी पाटील हे गंभीर जखमी होवून त्यांना अपगंत्व आले होते. त्यानंतर पाटील यांनी ट्रक चालक, मालक तसेच चोलामंडल विमा कंपनी यासह एसटी बसचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याविरूध्द न्यायालयात 45 लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायाधीश आर.जे.कटारीया यांनी निकाल देत एसटीचालक व महाराष्ट्र राज्य परिवहन मंहामंडळावरील दावा रद्द करत ट्रकचालक, मालक व विमा कंपनीस याप्रकरणी जबाबदार धरून पाटील यांना 11 लाख 66 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले असून ही नुकसान भरपाई 9 नोव्हेंबर 2012 पासून तर आजपर्यंत साडेसात टक्के व्याजासह अदा करावी तसेच दाव्याचा खर्च देखील देण्याचे आदेश दिले आहे.
ट्रकची बसला समोरून धडक
प्रवासी प्रमोद बन्सी पाटील हे 5 फेबू्रवारी 2011 रोजी एसटी बस क्रं. एमएच.20.डी.9665 ने जळगावकडून सोलापूरला जात होते. मात्र, चिंचोली गावाजवळ समोरून येणार्या ट्रक क्रं. केए.16.ए.8906 ने बसला जोरदार धडक दिली. यात प्रमोद पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यानंतर खाजगी रूग्णायालयात उपचार करण्यात आले. अपघातात मात्र, पाटील यांच्या दोन्ही पायाला फॅक्चर झाले. 5 फेबू्रवारी ते 21 मार्च पर्यंत त्यांच्यावर उपचार चालले. त्यानंतर 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2011 या दरम्यान त्यांच्यावर रूग्णालयात उपचार झाले. मात्र, उपचार होवून देखील त्यांना अपगंत्व आले. या दरम्यान, त्यांचा लाखो रूपयांचा खर्च उपचारावर लागला. प्रमोद पाटील यांनी 2012 मध्ये ट्रकचालक, मालक, चोला मंडल विमा कंपनी, एसटी बसचालक व महाराष्ट्र परिवहन राज्य मंडळा यांच्याविरूध्द न्यायालयात 45 लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला.
एसटी महामंडळावरील दावा रद्द
न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात खटला चालला. यात साक्षी व पुरावे तपासण्यात आले. यात पाटील यांना 37 टक्के अंपगत्व आल्याचेही निषन्न झाले. न्या. कटारिया यांनी फिर्यादीतर्फे अॅड. घोलप व एसटी महामंडळातर्फे अॅड. वियय काबरा यांनी युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्या. कटारिया यांनी एसटीचालक व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाविरूध्द दाखल दावा हा रद्द केला आणि ट्रकचालक, मालक व चोला मंडल विमा कंपनी यांना जबाबदार धरत 11 लाख 66 हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश दिले. त्यातच नुकसान भरपाई देतांना ही 9 नोव्हेंबर ते आजपर्यंत साडेसात टक्क्यांनी व्याजासह अदा करण्याचेही आदेश दिले आहे. यासोबतच दाव्यावरचा खर्च देखील अदा करण्याच्या सुचना केल्या आहे. याप्रकरणी एसटी महामंडळातर्फे अॅड. विजय काबर यांनी कामकाज पाहिले.