जळगाव। येथील टॉवरचौक परिसरात सकाळी सुसाट वेगात ट्रकचालकाने समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
टॉवरचौकाकडे येणार्या ट्रक क्रमांक एमएच-19-जी-5321ने प्रकाश मेडीकल स्टोअर्सजवळ ट्रक आणून उभ्या असलेल्या चारचाकी क्रमांक बीपी-74-झेड-14 हिला ठोस देवून तिचे 17 हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रोहित राजेंद्र गोहे रा. मुंदडानगर यांचे फिर्यादीवरुन ट्रकचालक शकील कडू पिंजारी याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि ढिवरे हे करीत आहेत.