रावेर : रावेर शहरात मध्यरात्री ट्रक व टाटा मॅजिकची धडक झाल्याने चालक जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशाकडून बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ट्रक (एच.आर. 55 डब्लू 1196) हा चालक दीपु करणसिंग बघेल (रा.शिवपुर, मध्यप्रदेश) हा जळगावच्या दिशेने जात असतांना समोरुन येणारी टाटा मॅजिक (एम.एच. 19 बी. 9997) मध्ये समारो-समोर धडक होवून त्यात टाटा मॅजिक चालक प्रदीप तुकाराम पाटील (रा.कुसुंबा जळगाव) हा जखमी झाला. याबाबत प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.