Two bikers from Ghodgaon were killed when they were run over by a speeding truck चोपडा : भडगाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात घोडगावातील दोघे युवक ठार झाले. हाते-गलंगीच्या दरम्यान सोमवरी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले
हातेड-गलंगी दरम्यानक सोमवारी सायंकाळी घोडगाव येथील कमलाकर बारेला व कुसुंबा येथील गोलू बारेला हे दोन्ही दुचाकी (एम.एच.19 बी.पी.4940) ने चोपड्याहून गलंगीकडे जात असताना पाटचारीजवळ मागून ट्रकने धडक दिल्याने दोघे युवक जागीच ठार झाले. दरम्यान, अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देताच पळ काढला.
ट्रॅक्टरमधील मजूरही जखमी
दुचाकी अपघातामुळे मागून येणार्या ट्रॅक्टरच्या चालकाला अचानक ब्रेक दाबावा लागल्याने ट्रॉली पलटून सहा-सात मजूर जखमी झाले. दरम्यान, रात्री उशीरा दोन्ही तरुणांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.