ट्रकची दुचाकीला धडक, मोहाडीच्या विवाहितेचा मृत्यू

0

बांभोरीजवळ अपघात ; पती जखमी

जळगाव :- भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाले. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर हा अपघात झाला. मोहाडी येथील रहिवासी वसंत पंडीत खैरनार (60) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (52, रा.मोहाडी, ता.जळगाव) हे दुचाकी (एम.एच.19 ए.जे.4417) ने आप्तेष्टांकडे जात असताना बांभोरीजवळ जैन इरिगेशन कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्र.डब्यु.बी.23 ई 9415) जोरदार धडक दिली.

त्यात वसंत खैरनार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्याने या ट्रकचे टायर त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे चित्र पाहताच पतीची शुद्ध हरपली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला.