ट्रकची मोटार सायकलला धडक; 1 ठार तर 2 जखमी

0

चाळीसगाव । भडगावकडून भरधाव वेगाने येणार्‍या गॅस हंडी ने भरलेल्या ट्रक ने समोरून येणार्‍या टीव्हीएस स्टार मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील एकाच जागीच मृत्यू झाला व एक जण जखमी तर पायी चालवणार्‍याला मोटारसायकल लागल्याने तो हि जखमी झाल्याची घटना 30 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव रोडवरील पातोंडा ओझर गावा दरम्यान हॉटेल स्वदेशच्या पुढे रोडवर घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाचे पलायन
पांडुरंग सुरेश चौधरी (25) रा.पातोंडा ता.चाळीसगाव व विजय हिलाल महाजन (35) रा तांदुळवाडी ता भडगाव हे दोघे चाळीसगाव कडून पातोंडा कडे त्यांची टीव्हीएस स्टार मोटार सायकलवरून जात असतांना भडगावकडून चाळीसगाव कडे येणार्‍या गॅस हंडी ने भरलेल्या भरधाव ट्रक क्र एम एच 18 एए 9287 ने त्याच्या मोटारसायकलला ओझर पातोंडा गावादरम्यान हॉटेल स्वदेशच्या पुढे एकनाथ शंकर पाटील यांच्या शेताजवळ 30 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास समोरून धडक दिल्याने मोटारसायकल वरील विजय हिलाल महाजन (35) तांदुळवाडी ता भडगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर पांडुरंग सुरेश चौधरी (25) यांच्या पायाला जबर मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्या ठिकाणावरून पायी जात असलेले रामदास अशोक बकासे (रा पातोंडा ता चाळीसगाव ) यांना मोटारसायकल लागल्याने ते हि किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यावर ट्रक चालकाने तेथे न थांबता तेथून पलायन केले आहे. या प्रकरणी पांडुरंग सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला वरील ट्रक च्या अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत. जखमी पांडुरंग चौधरी यांचेवर शहरातील वाय पी पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.