नंदुरबार । धुळे नंदुरबार रस्त्यावर असलेल्या घोटाणे येथून प्रवाशी भरून जाणार्या रिक्षाला समोरून येणार्या भरधाव वेगाने येणार्या ट्रकची जोरदार धडक दिल्याने रिक्षातील 44 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालकासह अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे- नंदुरबार रस्त्यावर असलेल्या घोटाणे येथील चार प्रवाशी रिक्षात बसल्यानंतर दोंडाईचाकडे रवाना होत असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने गावासून हाकेच्या अंतरावर रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रजूबाई शिवाजी गोसावी (वय-44, घोटाणे ता.नंदुरबार) ह्या जागीच ठार झाल्या असून रिक्षाचालक मोहन गोसावी, मोहन देवराम कोळी (दोन्ही रा. घोटाणे ता. नंदुरबार) आणि राजाराम मास्तर (पुर्ण नाव माहित नाही, रा. आसाणे ता. नंदुरबार) हे तीघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना दोंडाईचा येथिल उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहीती मिळाल्यानंतर नंदूरबार ग्रामीण पोलीस घटनस्थळी धाव घेतली आहे.