नवापूर:येथील नवापूर-पिंपळनेर चौफुलीजवळ एका मालट्रकची तपासणी केल्यावर पोलिसांना गुटख्यासह तंबाखूचा माल आढळून आला. येथील पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून कारवाई करण्यात आली. कारवाईत 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पथकाने केलेल्या कारवाईने पुन्हा गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत नवापूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ट्रक चालकासह क्लिनरला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे, जीवनावश्यक वस्तू वाहतुकीच्या नावाखाली मालट्रक (क्र. एमएच 31 सीबी 8837) मध्ये तांदूळाच्या चुरीच्या आड महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्यासह तंबाखूचा मुद्देमाल लपविलेला आढळून आला. मालट्रक आणि मुद्देमाल असा 55 लाखाचा साठा जप्त केला. ट्रक चालक सवनकुमार रामचंद्र साकेत (वय 21, रा.रामनगर रिवा मध्यप्रदेश), क्लीनर अजयकुमार कौशल प्रसाद साके (वय 20, रा.हिरामनपुर, वाराणसी यु.पी.) यांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक विजययसिंग राजपूत, सहाययक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धीरज महाजन, असई कृष्णा पवार, पोहेकाँ. गुमानसिंग पाडवी, विलास पाटील, पोना प्रवीण मोरे, निलेश दहीफळे, पोकाँ.दिनेश बाविस्कर, जयेश बाविस्कर, योगेश साळवे, निशान गिते, आदिनाथ गोसावी, शाम पेढारे, जगदीश सोनवणे, हेमंत सैंदाणे यांनी केली.
तपास सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, पो.काँ. जयेश बाविस्कर करीत आहे.