पलासखेडे (ता.पारोळा ) -कासोदा येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर पातरखेडे गावाजवळ एरंडोल कडून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.यात पलासखेडे येथील 65 वर्षीय रहिवासी महादू माहरु पाटील ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पातरखेडे फाट्याजवळ घडली.दरम्यान ट्रक चालक फरार झाला असून ट्रक एरंडोल पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे अंत पलासखेडे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पलासखेडे येथील रहिवासी महादू महारु पाटील (महाडिक) हे एम.एच.19 -ए.टी.0694 क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून एरंडोलकडे जात होते.पातरखेडे फाट्याजवळ ओ. आर.15 आर.0795 क्रमांकाचा मालट्रक भरधाव वेगाने ओव्हर टेक करत येऊन दुचाकीला समोरून धडक दिली. मारली.यात महादू पाटील हे रस्त्यावर खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल पाटील यांनी मृत घोषित केले.याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. ला भाग 5 गु.र.नं.75/19 भा.द.वि.कलम 279,304 (अ),मोटर व्हेईकल ऍक्ट 184 प्रमाणे दाखल आहे.सहाय्यक फौजदार प्रदीप चांदोलकर व अरुण मोरे हे तपास करीत आहे.महादू पाटील यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.