ठाणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ब्रम्हांड सिग्नल येथे घडली. या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोड येथील उन्नती ग्रीन या इमारतीत राहणारे नीरज मुरलीधर पोरवाल (31) हे ठाण्याकडून कासारवाडवलीकडे आपल्या दुचाकीने जात असताना ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या जीजे 6 झेडझेड 7410 या क्रमांकाच्या ट्रकने पोरवाल यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धड़क इतकी जोरदार होती की त्या धडकेत दुचाकीस्वार नीरज मुरलीधर पोरवाल यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रक चालक विरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.