ट्रकच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

0

रावेर । ट्रक व मोटरसायकलसमोरा-समोर येऊन धडकल्याने अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना बुधवार 22 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खानापुर-चोरवड दरम्यान नागोरी नाल्यानजीक घडली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचालक फरार

आसिफ बक्श मुमताज (वय 25) व मोहम्मद आरिफ मो कुरशिद दोघेही राहणारे बर्‍हाणपुर (मध्यप्रदेश) हे त्यांच्या बिना नंबर असलेल्या मोटारसायकलने रावेरच्या दिशेने येत असतांना बुरहानपुरकड़े जाणारा ट्रक क्रमांक एमएच 19, झेट 5393 हा भरधाव वेगाने जात असतांना त्याने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या मध्ये एक जण जागीच ठार झाला. तर दूसरा गंभीर जखमी अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात आणत असतांना मयत झाला येथील शेख रशीद यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याबाबतचा तपास फौजदार ज्ञानेश फडतळे पोलिस कॉन्स्टेबल नीलेश चौधरी, विलास तायडे, संदीप खंडाळे हे करीत आहेत.

आसिफचा पुढील महिन्यात होता विवाह
अपघातात मयत झालेला आसिफ बक्श याचा पुढील महिन्यात 22 एप्रील रोजी विवाह सोहळा आयोजित केला होता. परंतु अपघातात जिवनयात्रा संपल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचे संकट कोसळलेले आह. दरम्यान या अपघाताची बातमी बर्‍हाणपूर परिसरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.