ट्रकच्या धडकेत मामाचा मृत्यू, भाची जखमी

वाघळूद फाट्याजवळ अपघात : वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात

यावल : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत मामाचा मृत्यू झाला तर भाची जखमी झाली. हा अपघात यावल-भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्याजवळ बुधवार, 21 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकीवरील दगडू रामदास शिंदे (45, आव्हाणे, ता.जळगाव) यांचा मृत्यू झाला तर त्यांची भाची मनीषा ईश्‍वर सोनवणे (19) ही गंभीर जखमी झाली. अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक जप्त करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.