निगडी : भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चिरडल्याने पायी चालणार्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी बाराच्या सुमारास निगडी येथील जुना पीएमपीएमएल बस स्टॅन्ड समोर भक्ती शक्ती चौकात घडली. रामदास नेताजी शिंदे (वय 30, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर नेताजी शिंदे (वय 22, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालक गजेंद्र चंद्रभान उगलमुगले (रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड. मूळ रा. वाघेर बाभुळगाव, ता. केज, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
रस्ता ओलांडना अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रामदास भक्ती शक्ती गार्डनजवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एम एच 12 / के पी 9998) त्यांना धडक दिली. रामदास खाली कोसळून ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. यामध्ये त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.